Thursday 27 October 2011

इतिहास १६व्या शतकात आटपाडी गाव हे आदिलशाहीचा भाग होते व नंतर पेशवाईच्या काळानंतर आटपाडी औंध संस्थानामधे महाल गाव होते. औंध संस्थानाच्या भारत गणराज्यामधिल विलीनीकरणानंतर आटपाडी खानापूर तालुक्यातील एक गाव व नंतर सांगली जिल्ह्यातील एक तालुका झाल आहे. [संपादन] भूगोल आटपाडी गाव अक्षांश =१७.२५/रेखांश= ७४.५७ वर वसलेले आहे. गावाच्या मधुन शुक्र ओढा आटपाडी गावाला दक्षिण व उत्तर भागामध्ये विभागत गेला आहे. आटपाडीच्या पश्चिमेला पाझर तलाव आहे जिथुन आटपाडीच्या पिण्याच्या व काही प्रमाणात शेतिच्या पाण्याची व्यवस्था होते. आटपाडी गाव व नविन आटपाडीची वसाहत ही शुक्र ओढयाने दक्षिण व उत्तर अशी विभगली आहे. [संपादन] हवामान आटपाडी तालुका पर्ज्यन्यछाये मध्ये येणारा प्रदेश आहे. येथील मुख्य शेती ही ज्वारी, मका, गहू, काही प्रमाणात ऊस व कापूस आणि डाळिंब यांची होते. डाळिंबामुळे आटपाडीच्या शेती ऊत्पादनात आमूलाग्र बदल झाला आहे. [संपादन] आजूबाजूचा परिसर [संपादन] शासन व्यवस्था आटपाडीची शासन व्यवस्था ग्रामपंचायत व पंचायत समिति मार्फत चालते. आटपाडी मध्ये दिवानी व फौजदारी न्यायालय, पोलिस ठाणे आहे. [संपादन] आटपाडी ग्रामपंचायत आटपाडी गावाचे प्रशाशकीय कामकाज ग्रामपंचायती मार्फत चालते. [संपादन] आटपाडी पंचायत समिती आटपाडी तालुक्याचे प्रशाशकीय कामकाज पंचायत समिती मार्फत चालते. [संपादन] शिक्षण व्यवस्था आटपाडी मधे शिक्षण महाविद्यालय स्तरापर्यन्त कला, विज्ञान, वानिज्य, अभियांत्रिकी, अध्यापन इत्यादी शाखांमध्ये शक्य आहे. शिक्षण व्यवस्था ही प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय इत्यादी पातळी पर्यन्त उपलब्ध आहे. [संपादन] प्राथमिक शाळा [संपादन] माध्यमिक शाळा श्री भवानि विद्यालय हायस्कुल श्री राजाराम बापु पाटील हायस्कुल श्री व.दे.दे. गर्ल्स् हायस्कुल [संपादन] उच्च माध्यमिक श्री भवानि विद्यालय जुनिअर सायन्स् कॉलेज आटपडी कॉलेज, आटपाडी. [संपादन] महाविद्यालय आटपडी कॉलेज, आटपाडी कला विज्ञान महाविद्यालय श्रीराम सोसायटीचे अभियन्त्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय अध्यापक विद्यालय शेति पदविका विद्यालय [संपादन] उद्योग व्यवसाय माणगंगा सहकारी साखर कारखाना, बाबासाहेब देशमुख सहकारी सुतगिरणी, डाळिंब प्रक्रिया व पॅकेजिंग प्रकल्प हे येथील प्रमुख उद्दोग आहेत. [संपादन] कला आणि संस्कृती व मनोरंजन आटपाडीचे नाव कलेच्या क्षेत्रात वाखणण्यासारखे आहे ते आटपाडी मध्ये जन्मलेल्या ४ साहित्य संमेलानाचे अध्यक्षामुळे १) ग. दि. माडगुळकर, २)व्यंकटेश माडगुळकर, ३) शंकरराव खरात, ४) ना. सि. ईनामदार. याच बरोबर धनगरी नृत्य आटपाडीच्या संस्कृतीचा मुख्य घटक आहे. कोल्हापुरी फेटा हा मुळचा माणदेशातिल लहरी पटका/फ़ेटा आहे. [संपादन] मंदिरे आणि उत्सव आटपाडीचे ग्रामदैवत उत्तरेश्वर आहे व आटपाडीची जत्रा उत्तरेश्वराच्या नावाने होते. जत्रा तीन दिवस चालते व याप्रसंगी गावातून उत्तरेश्वराचा रथ ओढण्याची प्रथा आहे.आटपाडीतील आणखी एक जुने मंदिर म्हणजे नाथबाबाचे व कल्लेश्वराचे मंदीर. आटपाडीत एक परमेश्वराचे पण मंदीर आहे. त्या देवळातल्या देवाला परमेश्वर म्हणतात. हे मंदिर शुक्र ओढ्यात आहे. आटपडीजवळ एक करगणी गाव आहे. तिथे एक प्राचिन शंकराचे देवळ आहे. हल्ली लोक त्याला रामाचे देवळ म्हणतात. ह्या देवळाची स्थापणा राम व लक्ष्मण यांनी केली असे म्हणतात. लक्ष्मणाला शंकराने एक खडग व आत्मलिंग दिले ते याच ठिकाणी. लक्ष्मणाने आत्मलिंआची स्थापना केली. दुसरे आत्मलिंग मंदिर गोकर्ण महाबळेश्वर (कर्णाटक) इथे आहे. करगणीचे पुर्वी नाव खडगणी होते, नंतर ते करगणी झाले. इथे मिळालेला खडग लक्ष्मणाने इंद्रजीताला मारण्यासाठी वापरले होते. करगणी जवळ एक शुकाचारी (अपभ्रंश शुक्राचारी, शुक्राचार्य ) नावाचा डोंगर आहे. इथे शुकमुनी यानी समाधि घेतली. ( शुकमुनी चे वडील महाभारतकार व्यास हे होत). शुकमुनीच्या समाधीचाअ उल्लेख पुराणात पण आहे. ब्रम्हचारी शुक दर्शनाला आलेल्या स्त्रियाना पाहून घोड्यावर बसुन गुहेमधिल दगडात लुप्त झाला अशी कथा आहे. आटपाडी तालुक्यातिल सर्वांत प्रसिद्ध मंदिर म्हणजे खरसुंडीचे सिद्धनाथ मंदिर. खरसुंडीचे आनखी एक वैशिष्ठ , इथली जनावरांची यात्रा. जानावरंचा हा देशातील सर्वांत मोठा बाजार आहे. [संपादन] प्रवास आणि मुक्काम आटपाडी हे गाव रस्त्याने सांगली, सोलापूर, कराड या नगराबरोबर तसेच इतर प्रमुख गावांशी जोडलेले आहे. आटपाडीपासून मुंबई, पुणे, हैदराबाद या महानगरापर्यंत थेट बस सेवा उपलब्ध आहे. मुख्यता प्रवास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसने व खाजगी आराम बसने उपलब्ध आहे.


No comments:

Post a Comment