5000 स्कूल कॉलेजो में और 800 जेलों कारागृह में नैतिक शिक्षा का पाठ पढ़ाया है जिससे इनका नाम इंडिया बुक रिकार्ड में दर्ज है ब्रह्माकुमारीज़ माउंट आबू में ईश्वरीय सेवा में 35 वर्षो से समर्पित है.
Thursday, 27 October 2011
आटपडीजवळ एक करगणी गाव आहे. तिथे एक प्राचिन शंकराचे देवळ आहे. हल्ली लोक त्याला रामाचे देवळ म्हणतात. ह्या देवळाची स्थापणा राम व लक्ष्मण यांनी केली असे म्हणतात. लक्ष्मणाला शंकराने एक खडग व आत्मलिंग दिले ते याच ठिकाणी. लक्ष्मणाने आत्मलिंआची स्थापना केली. दुसरे आत्मलिंग मंदिर गोकर्ण महाबळेश्वर (कर्णाटक) इथे आहे. करगणीचे पुर्वी नाव खडगणी होते, नंतर ते करगणी झाले. इथे मिळालेला खडग लक्ष्मणाने इंद्रजीताला मारण्यासाठी वापरले होते. करगणी जवळ एक शुकाचारी (अपभ्रंश शुक्राचारी, शुक्राचार्य ) नावाचा डोंगर आहे. इथे शुकमुनी यानी समाधि घेतली. ( शुकमुनी चे वडील महाभारतकार व्यास हे होत). शुकमुनीच्या समाधीचाअ उल्लेख पुराणात पण आहे. ब्रम्हचारी शुक दर्शनाला आलेल्या स्त्रियाना पाहून घोड्यावर बसुन गुहेमधिल दगडात लुप्त झाला अशी कथा आहे. आटपाडी तालुक्यातिल सर्वांत प्रसिद्ध मंदिर म्हणजे खरसुंडीचे सिद्धनाथ मंदिर. खरसुंडीचे आनखी एक वैशिष्ठ , इथली जनावरांची यात्रा. जानावरंचा हा देशातील सर्वांत मोठा बाजार आहे. [संपादन] प्रवास आणि मुक्काम आटपाडी हे गाव रस्त्याने सांगली, सोलापूर, कराड या नगराबरोबर तसेच इतर प्रमुख गावांशी जोडलेले आहे. आटपाडीपासून मुंबई, पुणे, हैदराबाद या महानगरापर्यंत थेट बस सेवा उपलब्ध आहे. मुख्यता प्रवास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसने व खाजगी आराम बसने उपलब्ध आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment