Tuesday, 25 October 2011

भगवान दगडू चवरे मुकाम तलेवाडी तालुका आटपाडी जिला सांगली

गणपतीचे अध्यात्मिक रहस्य
भारतात बहुसंख्य लोक गणपतीची पूजा, साधना करतात. शुभप्रसंगी धार्मिकविधीचा प्रारंभ तसेच व्यापारी आपल्या वह्यांची सुरवात गणपतीच्या स्तवनानेच स्वस्तिकाचे चिन्ह काढून करतात.परंतु विचार करण्यासारखी गोष्ट हि आहे कि, केवळ दर्शन, पूजन एवढच पुरेस आहे का ? यापेक्षा त्या बरोबर गणपतीचे " अध्यात्मिक रहस्य" जाणून दिव्य गुणांना अष्ट शक्तींना विवेकपूर्ण रीतीने स्वजीवनात धारण करणे (अष्टविनायक ) सर्वविघ्ने पार करणे (विघ्नहर्ता )व ज्ञानाचा उपयोग करून सफलता प्राप्त करणे (सिद्धिविनायक ) २१ जन्मांसाठी उज्वल भविष्याचे भाग्य संपादन करणे (२१ दुर्वांची जुडी )हे जास्त महत्वाचे आहे, नाही का ?
:श्री गणेशाच्या चित्रावरून त्यांच्या चरित्राचे दर्शन होते ते असे:
गजमुख :-विशाल बुद्धी व ईश्वराप्रती निश्चयाचे प्रतिक
गजकर्ण ;-सत्यज्ञान श्रवण आणि व्यर्थ वाइटासाठी कान बंद
गजचक्षु :-दुसर्यांमध्ये महानता बघण्याची वृत्ती
वक्रतुंड :-स्वतः च्या वांईट सवयी व मोठ्या अवगुणांना मुळापासून उखडून टाकणे व दुसर्यांचा आदर करणे
हातात परशु :-आयुष्यातील मोह,आसुरी स्वभाव, लोक लाज या बंधनांना तोडून मुक्ती व जीवनमुक्ती प्राप्त करणे
हातात दोरी :- ईश्वरीय नियम मर्यादांमध्ये स्वतः ला प्रेमाने बांधून घेणे
हातात मोदक (लाडू ) :-संघटनाने जीवनात गोडी निर्माण करून पूर्ण सफलता प्राप्त करणे
वरदानी हात :- सर्व प्राप्ती जनकल्याणासाठी वापरणे,सर्वाप्रती सदा सर्वदा शुभकामना व्यक्त करणे
लंबोदर :- समस्या, निंदा,चिंता आदींचे वर्णन न करता पोटात सामावून घेणे .
मूषक वाहन :-अविवेक,कुतर्क यावर विवेकाचा विजय.
स्वस्तिक चिन्ह :-चार युगांच्या सृष्टीचक्राच्या ज्ञानाच्या आधारावर सदैव शुभविचार व शुभकर्मे करण्याचे प्रतिक
गणनायक :- शिवपुत्र,गण म्हणजे प्रजा,प्रजांचा नायक( पिता )म्हणजे परमपिता परमेश्वर असा जो आदि
नाथ त्याचीच पूजा गणपतीच्या रुपात होते
आपणही आपल्या जीवनात गणपती प्रमाणे आपल्या जीवनाला श्रेष्ठ,उदात्त,उदार व आदर्श बनवू या

No comments:

Post a Comment