Saturday 5 January 2013

कर्म हेच मनुष्याचे मित्र-शत्रू ः भगवानभाई

कर्म हेच मनुष्याचे मित्र-शत्रू ः भगवानभाई
Inbox
x

BK Bhagwan Bhai
12:05 PM (6 hours ago)

to bcc: me
कर्म हेच मनुष्याचे मित्र-शत्रू
ः भगवानभाई
तभा वृत्तसेवा
भंडारा, १ ऑक्टोबर
क र्माप्रमाणे मनुष्य स्वतःचे जीवन
महान बनवू शकतो किवा सर्वस्व
गमावून कंगाल बनू शकतो. कर्म हेच
मनुष्याचे मित्र किवा शत्रू आहेत, असे
प्रतिपादन माऊं ट अबू राजस्थानस्थित
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय
विद्यालयाचे राजयोगी ब्रह्मकुमार
भगवानभाई यांनी केले.
‘स्वतःमध्ये परिवर्तन करण्याची
संधी' या विषयावर ते जिल्हा
कारागृहामध्ये कैद्यांसमोर बोलत होते.
भगवानभाई म्हणाले, मनुष्याच्या
चुकाच मनुष्याला खरे मनुष्य
बनवितात. दुसरयांचा बदला घेण्याची
भावना सोडून स्वतःच्या जीवनामध्ये
काहीतरी बदल घडवून आणल्याने
फायदा आहे. बदला घेतल्याचा
प्रवृत्तीने समस्या वाढतात. वाल्या डाकू
होता, त्यानी आपल्या जीवनामध्ये
काहीतरी परिवर्तन आणल्यामुळे तो
वाल्मीकि झाला. आता आपणही
परिवर्तन करण्याचा दृढ निश्चय करा.
कारागृह हे कारागृह नाही तर सुधारगृह
आहे. येथे तुम्हाला शिक्षा किवा दंड
देण्यासाठी ठेवले नाही, तर
सुधारण्यासाठी ठेवले असल्याने
जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना
काही कल्याण समावलेले आहे.
जीवनातील प्रत्येक गोष्टीची चिंता
करण्याऐवजी ईश्वराचे चितन करून
आपल्या हातून पुन्हा चुका होऊ नयेत
म्हणून व्यसनापासून दूर रहा.
ते पुढे म्हणाले की, आध्यात्मिक
ज्ञानाचे चितन कराल, चांगली पुस्तके
वाचाल तर मग आपल्यामध्ये नक्की
बदल घडून येईल.
जिल्हा कारागृह अधीक्षक अशोक
रामचंद्र जाधव उद्बोधन करताना
म्हणाले की, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये
परिवर्तन घडवून आणा कारण की,
तुमच्या कर्माने तुमचे नातेवाईक,
आईवडीलसुध्दा दुःखी होतात. तुम्ही
आपल्या वाईट सवयी सोडून
मानवाप्रमाणे जगा तरच खरे सुख
मिळेल. तत्पूर्वी, जेल अधीक्षकांनी
ब्रह्मकुमार भगवानभाई, शांता दिदी
आणि बहनजींचे हार घालून स्वागत
केले. जेलर डी.एम. राऊत ने
कार्यक्रमाची रूपरेखा सांगितली. या
कार्यक्रमामध्ये गुलाबभाई, गौरीभाई,
बडवाईक आणि कारागृह कर्मचारी
उपस्थित होते. शेवटी साहित्य वितरण
करण्यात आले.

No comments:

Post a Comment