Saturday, 5 January 2013

सकारात्मक विचार हाच आत्मबलाचा आधार : भगवानभाई

सकारात्मक विचार
हाच आत्मबलाचा
आधार :
भगवानभाई
तभा वृत्तसेवा
नागपूर, २ ऑक्टोबर

सकारात्मक विचारांच्या
माध्यमातून अशक्य असलेली बाबही शक्य करता येते. कारण
सकारात्मक विचारांमुळे मनोबल व
आत्मबलात वृद्धी होत असून
सकारात्मक विचार हाच
आत्मबलाचा प्रमुख आधार
असल्याचे प्रतिपादन माऊंट आबू
येथून आलेले आतंरराष्ट्रीय वक्ते
बी. के. भगवानभाई यांनी केले.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय
विश्वविद्यालयाच्या वतीने खामला
स्थित गुलमोहोर सभागृहात
आयोजित ‘भट्टी' या कार्यक्रमात
मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी सनराईज पीस मिशनच्या
वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ.
हरगोविद मुरारका यांच्या हस्ते
भगवानभाई यांना ‘विदर्भ रत्न'
अवार्ड प्रदान करण्यात आला.
सकारात्मक भावना ही
अध्यात्माचे प्रवेशद्वार असल्याचे
सांगत भगवानभाई पुढे म्हणाले
की, सकारात्मक भावना
मनुष्याच्या मौलिक गुणांचा विकास
करते व अध्यात्माकडे आकृष्ट
करते. या एक दिवसीय
कार्यक्रमातील तीनही सत्रात त्यांनी
मार्गदर्शन केले. यावेळी विदर्भ
विभागीय प्रशासिका बी. के.
पुष्पारानी दीदी, बी. के. रजनी
दीदी, राजश्रीदेवी मुरारका
यांच्यासह असंख्य साधकगण
उपस्थित होते.

No comments:

Post a Comment