Tuesday 27 August 2013

भगवान दगडू चवरे तळेवाडी ब्रह्माकुमार भगवानभाईंनी

तळेवाडी विषय थोडेसे


          
तळेवाडी ग्रामपंचायत



  निर्मल ग्राम                                             ता.आटपाडी जि.सांगली  
                              स्थापना-31/08/1966

तळेवाडी विषय थोडेसे

        इतिहास

      
श्रावणबाळ
               तळेवाडी आटपाडी तालुक्यातीत एक खेडे, राजा दशरथ यांनी मात-पित्याला कशीला घेऊन निघालेला  श्रावणबाळ आपल्या तहानलेल्य आई-वडीलांना पाणी आणण्यासाठी गावाच्या पुर्वेस असना-या तळ्याकाठी गेला होता . राजा दशरथ तळ्यापासुन लांब सावज टिपण्यासाठी बसला होत. श्रावणबाळाणे पाण्यासाठी आणलेला घडा तळ्यात बुडवत  असताना बुडबुड असा आवाज राजा दशरथ याच्या कानी आला त्यादिशेने  बाण सोडला तो सरळ श्रावणबाळाच्या ऋद्यात... राजा दशरथ जवळ येऊन पाहतो तो एक बालक . त्या बालकाची विचारपुस राजा दशरथ यांनी केली. राजा दशरथ श्रावणबाळाच्या आई-वडीलांना पाणी पाजण्यासाठी घेऊन गेला.  त्यांना पाणी देत असताना आई-वडीलांनी पाणी फार दुर होते कारे फार त्रस झाला काय असे विचारता राजा दशरथ काहीच बोलला नाही. त्यावर श्रावणबाळाला आई-वडील म्हणाले जोपर्यत तु बोलत नाही तोपर्यत आम्ही पाण्याचा घोटही घेणार नाही.
               राजा दशरथने श्रावणबाळाच्या आई-वडीलाना घडलेली हकीकत सांगीतली. श्रावणबाळाचे आई-वडील आपल्या पुत्राच्या विरहाने दुःखी व्याकुळ झाले. आणि राजा दशरथाला, तुही असाच पुत्राच्या विरहाने व्याकुळ होऊन मरशील असा शाप दिला.
आणि आपले प्राण सोडले.
               यावरुन तळेवाडी असे नाव पडले. अशी अख्याईका सांगितली जाते.